loader
Breaking News
Breaking News
Foto

पालवणी पंचक्रोशीतील न्यू इंग्लिशस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना मेहता कुटूंबीयांनी दिली शालोपयोगी वस्तूची भेट

मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील रयत शिक्षण सस्था सातारा न्यु इंग्लिश स्कूल पालवणी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी मुंबईतील सुप्रसिद्ध व दानशूर उद्योजक नेहमीप्रमाणे मदतीचा हात घेऊन पुढे आले आहेत. आज पालवणी विद्यालयात एका विशेष कार्यक्रमांतर्गत खालील आदरणीय मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य साहित्य वाटप करण्यात आले. जयेशभाई मेहता व त्यांच्या सुविधेचारी पत्नी गीताताई मेहता (प्रसिद्ध उद्योजक, मुंबई), अतुलभाई शहा व त्यांच्या पत्नी झरनाताई शहा (व्याही) यावर्षी करण्यात आलेले साहित्य वाटप हे या दात्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून खालील उपयुक्त साहित्याची थेट मदत केली आहे:

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि पेन (शैक्षणिक साहित्य), विद्यार्थी वसतिगृहासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना दिलासा मिळावा म्हणून नवीन पंखे, भोजनासाठी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ताटे आणि ग्लास मागील वर्षाचे अमूल्य योगदान हे दातृत्व केवळ याच वर्षापुरते मर्यादित नसून, मागील वर्षीही या मान्यवरांनी विद्यालयाला अंदाजे १,५०,०००/- (दीड लाख) रुपयांचा वॉटर कुलर व फिल्टर भेट दिला होता. जेणेकरून मुलांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी मिळेल. सोबतच विद्यालयासाठी पंखे आणि वह्यांचेही वाटप केले होते.

टाईम्स स्पेशल

मेहता आणि शहा परिवाराने दाखवलेल्या या दातृत्वामुळे आपल्या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळाली आहे. विद्यालयाच्या भौतिक सुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे. पालवणी विद्यालयाचे प्रशासन, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि समस्त पालवणी पंचक्रोशीच्यावतीने जयेशभाई मेहता, अतुलभाई शहा आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानतो व त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच हे सर्व साहित्य मिळवून देण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी दत्ताराम मुरकर व वसतीगृह अधीक्षक पिंपळकर एस एस. यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार, मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg