loader
Breaking News
Breaking News
Foto

तिरोडा सरपंच, उपसरपंच यांचा स्तुत्य उपक्रम, पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची घरपट्टी स्वखर्चाने भरली

ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि पालकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी तिरोडा येथील सरपंच प्रियांका सावंत आणि उपसरपंच संदेश केरकर यांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला. चालू शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची चालू वर्षाची घरपट्टी या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या खिशातून भरली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की,शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच पटसंख्या वाढवणे आणि जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खाजगी शाळांच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ताण पडतो. अशा परिस्थितीत, जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने आपण करत असून आपण या पदावर असेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे गावातील गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवदाखल विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. सरपंच सावंत व उपसरपंच केरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपल्या बद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg