loader
Breaking News
Breaking News
Foto

जगन्नाथ पेडणेकर विद्यालयात योग दिवस उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्व प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे यांनी सांगितले. त्यानंतर योग दिनाबाबत मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, नौकासन, वज्रासन, वक्रासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार आदीची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, योगेश प्रिंदावणेकर, जनार्दन पाटोळे, आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg