loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण एसटी प्रशासन व नगरपालिकेतर्फे संयुक्त साफसफाई मोहीम

मालवण (प्रतिनिधी) - दरवर्षीच्या पावसाळ्यात मालवण एसटी स्टँड समोर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचून प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अखेर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्व:खर्चाने या गटाराच्या साफसफाईला सुरुवात केली असून या कामाची मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती तथा स्थानिक नगरसेविका पूनम चव्हाण यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून कौतुक केले. तसेच नगरपरिषदेकडूनही या साफसफाई मोहिमेला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बसस्थानक परिसरातील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारात गेली १० वर्षे साफसफाई झाली नव्हती. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली होती, तसेच माती व कचरा साचल्याने पाणी वाहण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. या सांडपाण्याचा त्रास एसटी आगारालाही सहन करावा लागत असल्याने, अखेर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने या गटाराच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. एसटी प्रशासनाच्या या सकारात्मक पाऊलाचे कौतुक करत नगरपरिषदेकडूनही या साफसफाई मोहिमेला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी या मोहिमेची पाहणी करून एसटी डेपोच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.

टाईम्स स्पेशल

बस स्थानकासमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचू नये, यासाठी येथील मुख्य मोरीची देखील नगरपालिकेमार्फत तातडीने साफसफाई केली जाणार आहे. या परिसरात यंदा पावसाळ्यात पाणी साचणार नाही, यासाठी नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. असे आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले. या मोहिमेदरम्यान उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका अश्विनी कांदळकर, मोहन वराडकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांच्यासह पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक सूर्यवंशी, स्वप्नील गडदे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg