पनवेल :- शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी योगगुरू करुणा तावडे यांनी उपस्थित नागरिकांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रकार शिकवत निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे त्यांनी सांगितले.
या भव्य कार्यक्रमाला उलवे व परिसरातील शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहाटेपासूनच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक योगाभ्यासात सहभागी झाले. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांसमवेत योगासने केली व सर्वांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव आर्ट्स, मी एअरकूल आणि विशाल डेकोरेटर्स यांनी टायटल स्पॉन्सर्स म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. योगाभ्यासामुळे निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहामुळे संपूर्ण क्रीडा संकुल परिसर आनंदमय व आरोग्यदायी वातावरणाने भारावून गेला होता. या उपक्रमातून नागरिकांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.












.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.