loader
Breaking News
Breaking News
Foto

शिदेंच्या शिवसेनेसह महायुतीला मोठा धक्का ; नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकूळ गिते विजयी

मुंबई : नाशिक विधान परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गोकूळ गिते हे ३८९ मतांनी विजयी झाले . तीन मंत्री तळ ठोकून असताना महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्याने हा अत्यंत धक्कादायक निकाल समजला जातो. शिदेंच्या शिवसेनेची एक जागा गमावल्यात जमा आ

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाशिक विधानपरिषद निवडणुकीमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. ज्या निवडणुकीवरून रणकंदन माजले होते, त्याच निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गिते यांनी धक्का देत अक्षरशः विजय खेचून आणला आहे, त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. निकालानंतर नरेंद्र दराडे यांची नाराजी लपून राहिली नाही. "आमचा विश्वासघात झाला," असा आरोपही त्यांनी केला. इतकेच नव्हे तर त्यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनीसुद्धा "आमचा विश्वासघात झाला असून केसाने गळा कापला" असं म्हटलं आहे.

टाइम्स स्पेशल

नाशिकची विधानपरिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये होती. या निवडणुकीमध्ये गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी शड्डू ठोकला होता, मात्र गणेश गिते यांनी माघार घेतली होती. गोकुळ गिते यांचा अर्ज कायम असल्याने या निवडणुकीकडे नाशिकसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता निवडणुकीनंतर धक्कादायक निकाल हाती लागला आहे. एकतर्फीच गोकुळ गिते यांनी मते घेताना नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg