loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी महोत्सवाचा शुभारंभ, संस्थेच्या ठेवी ४५० कोटी पार नेण्याचे उद्दिष्ट - अ‍ॅड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी, - २० जून ते २० जुलै हा ठेव वृद्धीमास घोषित झाला असून स्वरूपानंद पतसंस्थेने आकर्षक, विश्वासार्ह अशा ठेव योजना घोषित केल्या असून ठेवीदारांच्या स्वागतासाठी स्वरूपानंदच्या सर्व शाखा, कार्यालय सज्ज झाली आहेत. ठेववृद्धी मास हा संस्था आणि ग्राहक यांचा एकत्र येऊन साजरा होणारा उत्सव आहे. विश्वासार्हता, शिस्त, सातत्य आणि आर्थिक प्रबळता राखणारी स्वरूपानंद आणि आप्तेने, आपुलकीने संस्थेच्या ठेववृद्धी योजनांमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार यांचा सुंदर मिलाफ प्रत्येक ठेववृद्धी मासात होत असतो. त्या महोत्सवाचा शुभारंभ २० जून रोजी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठेववृद्धी मासात आपल्या ठेवीदारांसाठी स्वरुपांजली ठेव योजना १२ ते १८ महिने, ९% ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.७५% सर्वसाधारण व सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ८.७५% ज्येष्ठ नागरिक व महिला, ८.५०% सर्वसाधारण अशा योजना संस्थेने जाहीर केल्या आहेत. सर्व स्तरावरील ठेवीदारांना उत्तम ठेव पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक व महिला ठेवीदारांसाठी विशेष व्याजदराच्या योजना आखल्या आहेत. संस्थेच्या या ठेव योजनांना ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करतांना संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण वाढीव नफा, ०% छझअ, कर्जाचे प्रमाण, १६४ कोटींच्या बँक गुंतवणूका, ४१५ कोटींच्या ठेवी, २७% सीआरएआर चे प्रमाण अशा उत्तम स्थितीत स्वामी स्वरूपानंद ठेवीदारांना ठेव ठेवण्यासाठी साद घालत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg