loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या नकुलची आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत दमदार कामगिरी

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - हाँगकाँग येथे पार पडलेल्या ७ व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचा १३ वर्षीय नकुल भावेश कारेकर याने उल्लेखनीय कामगिरी करत अंतिम फेरीत सहावा क्रमांक पटकावला. या यशामुळे दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून महाराष्ट्र आणि भारतासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता नकुलची तयारी आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सुरू झाली असून, भविष्यातही तो आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दापोली तालुका, महाराष्ट्र आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नकुलच्या या यशामुळे दापोली तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून, योग्य संधी आणि सुविधांच्या बळावर ग्रामीण महाराष्ट्रातूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडू शकतात, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg