loader
Breaking News
Breaking News
Foto

क्षत्रिय मराठा मंडळतर्फे दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा सन्मान ; गौरव गुणवंतांचा!

रत्नागिरी : दहावी, बारावीचे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारे असते. आजची कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे. आता शिक्षणाच्या शाखा विस्तारल्या असून तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडू शकतात. जे क्षेत्र निवडाल त्यात परीपूर्ण ज्ञान घ्या. दहावी, बारावीचे आजचे शिखर शेवटचे नसून आता खऱ्या अर्थाने नवे प्रवेशद्वार उघडले आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी केले. देसाई बॅंक्वेट हॉल येथे क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित दहावी, बारावीतील गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डॉ. शुभांगी बेडेकर, मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, खजिनदार जितेंद्र विचारे, प्रचारप्रमुख संतोष तावडे, सचिव योगेश साळवी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आयुष्यात कितीही चढ- उतार आले तरी शिक्षणाच्या जोरावर तुम्ही पुढे जाऊ शकाल. आपण शिवरायांचे मावळे आहोत, त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करण्याचे व कठीण प्रसंगी भक्कम पाय रोवून पुढे जाण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. कितीही वाईट प्रसंग आले तरी त्यावर मात करून जिद्दीने पुढे जा. कितीही मोठे झालात तरी आईवडिल, गुरुजन व समाज, संस्कृतीला कधीच विसरू नका असे आवाहनही शिल्पा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना केले.डॉ. शुभांगी बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्यात अव्वल राहिले पाहिजे. त्याकरिता कष्ट, मेहनत घेतली पाहिजे, असे सांगितले. मोबाईल हा आताच्या काळातील इडियट बॉक्स असून त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. एक रिल पाहण्यासाठी मोबाईल हातात घेतल्यावर एक तास आपण वाया घालवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणही कमी होतात. सध्याच्या पिढीतील मुले जंक फूड मोठ्या प्रमाणात खातात, बैठे काम करतात. कोणताही व्यायाम करा, त्यावर तुमची शारीरिक क्षमता व मन शांत राहते. मानसिक विकारांमुळे शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे तब्बेतीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. मोठे स्वप्न बघा व सातत्य, प्रामाणिकपणा ठेवा, आरोग्याची काळजी घ्या. ज्या समाजाकडून आपल्याला मिळाले त्या समाजासाठी परतफेड करत राहा असा संदेश डॉ. बेडेकर यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

कार्याध्यक्ष राकेश नलावडे यांनी मनोगतामध्ये आपण हिंदुत्व कसे जपले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. तसेच तरुणांमधील वाढती व्यसनाधिनता याविषयी पालकांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.मंडळाचे प्रचारप्रमुख संतोष तावडे यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना मराठा विद्यार्थ्यांनी उद्योजक, व्यावसायिक बनावे. त्याकरिता मंडळ नेहमीच मार्गदर्शन, प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही दिली. उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी आजचे विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती असून ही भावी पिढी निरोगी, सुदृढ असली पाहिजे. विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची चरित्रे आवर्जून वाचावीत, असे आवाहन केले.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पवृष्टीने करण्यात आले. महाराष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. श्रेया पाटील हिने गणेशवंदना सादर केली. दीपप्रज्वलनानंतर नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्परोपटे देऊन करण्यात आले. सचिव योगेश साळवी आणि अमित कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये क्षत्रिय मराठा मंडळ विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असल्याने प्रोत्साहन मिळत असल्याचे आवर्जून सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कौतुकाची थाप म्हणजे पुढच्या आयुष्याची शिदोरी- शिल्पाताई सुर्वे

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg