loader
Breaking News
Breaking News
Foto

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्समध्ये निवड

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध तांत्रिक चाचण्या आणि मुलाखतींमधून कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही निवड कंपनीच्या गोवा युनिटसाठी करण्यात आली. याठिकाणी उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक व ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने, फॅक्टरी ऑटोमेशन सिस्टीम्स, मायक्रोबॉक्स पीसी, प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, स्विचगियर, प्रोटेक्शन रिले तसेच सबस्टेशन ऑटोमेशन उपकरणांचे उत्पादन केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कंपनीचे हे युनिट महत्वाचे मानले जाते.

टाईम्स स्पेशल

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक साडेतीन लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व टीपीओ हेड मिलिंद देसाई यांनी त्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg