loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यातील उद्योजक मंदार भिंगार्डे परिसर स्वच्छ करुन देताहेत स्वच्छतेचा संदेश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - स्वच्छता ही मानवी आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनशैलीसाठी अत्यंत आवश्यक सवय आहे. वैयक्तिक स्वच्छतेमुळे अनेक आजार दूर राहतात आणि संपूर्ण परिसर निरोगी व समृद्ध बनण्यास मदत होते. लांजातील उद्योजक मंदार भिंगार्डे हे नित्य नियमाने दरदिवशी सकाळी एक तास बाजार पेठेतील कोत्रे हॉटेल परीसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश देत असुन स्वच्छ भारत मिशन अभियानाला एकप्रकारे मदत करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदार भिंगार्डे यांचे कोत्रे रेस्टॉरंटच्या बाजूला मेडिकल स्टोअर आहे. दरदिवशी व्यवसायाला सुरूवात करण्याआधी सकाळी साडेसहा वाजता येऊन आजूबाजूचा परीसर स्वच्छ करतात. हे कार्य ते गेली बरीच वर्ष नित्यनेमाने करीत आहेत. एक सवयच त्यांच्या अंगी लागून गेली आहे.’आरोग्य हीच संपत्ती आहे’ आणि निरोगी आरोग्याची पहिली पायरी स्वच्छता आहे. मानसिक शांतता मिळते स्वच्छ आणि निटनेटक्या वातावरणात राहिल्याने मन प्रसन्न राहते आणि कार्यक्षमता वाढते. तसेच शरीराला चांगला व्यायाम मिळतो. आपण स्व:तापासून सुरूवात केली आहे. स्वच्छता अभियान हे मोठ कार्य असल्याचे मंदार भिंगार्डे यांनी बोलतांना सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg