सावंतवाडी, (प्रतिनिधी) : सहकारी पतसंस्था चळवळ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी पतसंस्था पदाधिकारी तसेच कर्मचार्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे शासनाने योजिले आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर बुधवार, दिनांक २४ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी (सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयाशेजारी), ता. कुडाळ येथे होणार आहे.
या प्रशिक्षणात इनकम टॅक्स प्रणाली, प्रभावी कर्ज वसुली, तसेच कर्ज वितरण धोरण या महत्त्वपूर्ण विषयांवर राज्यातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. हे प्रशिक्षण पतसंस्थांसाठी अत्यंत उपयुक्त असून, यासाठी प्रति प्रतिनिधी १५०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. सर्व पतसंस्थांनी हे शुल्क ’चअकअठअडकढठअ उज-जझ ऊएतएङजझचएछढ उजठझजठअढखजछ’, खाते क्र. ०३४००१६०००६००२३, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (आयएफएससी कोड- कऊऋउ०उझऊउउइ, शाखा- असीळ.उेश्रश्रशसश, र्झीपश) या खात्यावर भरून नोंदणी करावी. तसेच नोंदणीची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, सावंतवाडी यांच्या ९१३०३४३७६७ या मोबाईल क्रमांकावर कळवावी. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी जास्तीत जास्त प्रतिनिधींची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले आहे.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.