loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरडीचा धोका: चोळईजवळ वाहतूक संथ; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या कशेडी घाटात धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. चोळई नजीक मातीचा ढिगारा आल्याने सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यानच्या सुमारे २ किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान कशेडी घाटातील डोंगराचा मोठा भाग उभा कापल्याने चोळई हद्दीत दरड कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याचप्रमाणे, भोगाव हद्दीतील जुन्या महामार्गावर रस्ता खचल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र या ठिकाणी डोंगरावरून मोठमोठे दगड रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांच्या डोक्यावर दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्ता खचलेल्या ठिकाणी 'जय भारत' ठेकेदार कंपनीकडून सध्या तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकून रस्ता सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पावसाळ्याचे आगमन जवळ आले असूनही मुख्य काम पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जर वेळीच ठोस उपाययोजना केल्या नाहीत आणि दरडीचा मोठा भाग महामार्गावर कोसळला, तर संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg