loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत दिग्दर्शक दीपक कदम यांचा दणदणीत विजय

वैभववाडी (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक 2026 मध्ये दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक दत्ताराम कदम यांनी दणदणीत विजय संपादन करत संचालकपदी निवड होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय विजयामुळे मराठी चित्रपट सृष्टीत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खांबाळे (ता.वैभववाडी) या ग्रामीण भागातील मातीतून आलेल्या दीपक कदम यांनी आपल्या मेहनत, चिकाटी आणि कलात्मक दृष्टिकोनाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून प्रवास सुरू करत त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

टाईम्स स्पेशल

दीपक कदम यांनी आजवर विविध सामाजिक, कौटुंबिक, वास्तववादी तसेच मनोरंजनप्रधान विषय हाताळत 20 हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये समाजातील विविध प्रश्न, सामान्य माणसांच्या भावना, संघर्ष, नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण दिसून येते. त्यामुळे त्यांची ओळख केवळ दिग्दर्शक म्हणून नाही तर समाजमनाचा वेध घेणारा संवेदनशील चित्रपटकार अशी निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg