loader
Breaking News
Breaking News
Foto

मेघ राजाची नुसती आभाळमाया, धरणी आईची शेती जातेय वाया, पावशाचा कंठ ही सुकला ...

देवळे (प्रकाश चाळके) - आज पावसाचे बरेचसे अंदाज फोल ठरले आहे. पाऊस केरळला आला एक जून पर्यंत कोकणात पोहोचेल वार्‍यांचा जोर वाढतोय....... पाऊस गोव्यापर्यंत पोहोचला ..... पावसाचे आगमन आणखी काही दिवस पुढे जाण्याचे संकेत अशा अनेक बातम्या वाचून, बघून शेतकरी पावसाच्या आशेवर राहिला. आज गेले बरेच दिवस आकाशात नुसती मेघराजाची आभाळमायाच दिसत असून धरणी माता चातकासारखी वाट पाहत आहे. शेतकर्‍याने पेरणी केलेली वाया जाऊ लागली आहे. यावर्षीच्या तुलनेत निसर्गाचे अनेक धक्के अवकृपा दिसत असून उन्हाळ्यात भयानक उष्णता आणि जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणात रोहिणी आणि मृग नक्षत्रात पेरणी केलीच जाते. हा पूर्वंपार नियमच बनलेला आहे. त्यातच यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला म्हणजे सात तारखेला पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे कोकणातील शेतकरी सुखावला आणि पेरणी केली पेरणी उगवता उगवतात भयानक उष्णतेमुळे करपू लागली आहे. काही शेतकरी यावर पर्याय म्हणून उगवलेल्या रोपांना पंपाने शिंपण करू लागले आहेत ,आणि रोप वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच हवामान खात्याचा अंदाज पाऊस येतो पाऊस लांबणीवर गेला. त्यामुळे गोंधळलेला शेतकरी काय करावे या विवंचनेत आहे. काही शेतकरी असे म्हणत आहेत की ओला दुष्काळ परवडला पण हा सुखा दुष्काळ आला तर पिण्याचे पाणी ही मिळणार नाही. त्यापेक्षा मेघराज आमच्यावर कृपा कर एकदाचा बरंस अशी विनंती शेतकरी राजा करत आहे.

टाईम्स स्पेशल

निसर्गाचे काही बदल प्राणी, पक्षी, वृक्षवल्ली यांना कळत असतात. काही रुजणारी कंद ही पाऊस सुरू होण्यापूर्वी धरणी मातेच्या पोटातून बाहेर पडतात. तसेच पूर्वापार शेतकर्‍यांना पावसाची चाहूल लागणारा आणि पावसाची चातकासारखी वाट बघणार पावश्यापक्षी एप्रिल मे महिन्यात ‘पेरते व्हा पेरते व्हा’ असा टाहो फोडणारा जून महिन्यात कुठे गायब झाला की काय, की याचा कंठ दाटला म्हणून आवाज फुटत नाही अशी खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg