भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रम २०२६ घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात ३० जून २०२६ पासून होत असून, याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे. या विशेष मोहिमेत पारदर्शकता आणि अचूकतेसाठी खालीलप्रमाणे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत: कार्यक्रम / टप्पा कालावधी / तारीख अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ तयारी, प्रशिक्षण व छपाई कालावधी २० जून २०२६ ते २९ जून २०२६ BLO मार्फत घरोघरी भेटीचा कालावधी ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ जुलै २०२६ प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ५ ऑगस्ट २०२६ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी ५ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑक्टोबर २०२६ अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ७ ऑक्टोबर २०२६
मतदारांनी काय करणे आवश्यक - नाव तपासणी: मतदारांनी मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीत स्वतःचे आणि आपल्या नातेवाईकांचे नाव voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तपासून घ्यावे व घोषणापत्रात तपशील भरावा. BLO ची मदत: कोणत्याही मदतीसाठी मतदार आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) संपर्क साधू शकतात. मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसल्यास किंवा डेटाबेसशी जुळत नसल्यास, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदारास नोटीस पाठवण्यात येईल.
नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी स्वतःची जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी (तसेच आवश्यकतेनुसार माता-पित्यांचे) खालीलपैकी कोणतेही एक स्व-प्रमाणित कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे: १ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्म झालेल्या नागरिकांसाठी, तसेच भारताबाहेर जन्म झालेल्या किंवा नागरिकीकरण प्राप्त केलेल्या व्यक्तींसाठी नियमांनुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.