loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण - कसाल हमरस्त्यावर भीषण अपघातात सुकळवाडच्या दुचाकीस्वाराचा मृत्यु

मालवण प्रतिनिधी :मालवण-कसाल हम रस्त्यावरील सुकळवाड वरचा नाका येथे शुक्रवारी सायंकाळी पोलिसांची बोलेरो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (वय सुमारे ४०, रा. सुकळवाड-भंडारवाडी) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, मालवणहून ओरोसच्या दिशेने जाणारी पोलिसांची बोलेरो गाडी ही सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सुकळवाड बाजारपेठेतील वरचा नाका येथे आली असता समोरून येणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन जगदीश मांजरेकर यांचा मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली

टाइम्स स्पेशल

जगदीश मांजरेकर हे वृद्ध आई-वडील आणि सतत आजारी असलेला भावा समवेत राहत होते जगदीश हे एकुलते एक कमावते असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती त्यांच्या अकाली निधनाने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुकळवाड परिसरातून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg