loader
Breaking News
Breaking News
Foto

व्ही. एन. नाबर प्रशालेत नवीन विद्याथ्यांचे उत्साहात स्वागत

बांदा : प्रतिनिधी येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिड़ियम स्कृल, बांदा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात व्हावी या उददेशाने विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण शाळा परिसर तसेच वर्गखोल्या फुगे व फुलांच्या आकर्षक सजावटीने नटल्या होत्या. प्रथम मुख्याध्यापिका मनाली देसाई तसेच सर्व शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शाळेत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशाळेमधील इयता दहावीच्या वर्गखोलीची रंगरंगोटी व सुशोभीकरण मनोज कामत यांनी करून दिलेल्या वर्गखोलीचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नारायण पित्रे तसेच राजेश गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या स्वागत समारंभामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झाली असून त्यांचा शैक्षणिक प्रवास आनंददायी वातावरणात सुरू झाला. यावेळी प्रशाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg