कर्जत (जयेश जाधव) - 1953 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत असलेल्या कर्जत तमनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बंडू तुरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बंडू तुरडे यांच्या निवडीने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या कर्जत तमनाथ विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित सहकार संस्थेचे अध्यक्ष पदाची निवडणूक झाली. माजी अध्यक्ष परशुराम घारे यांनी आपल्या राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. संस्थेच्या 13 सदस्यीय संचालक मंडळातून अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अध्यासी अधिकारी शिवाजी घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
अध्यक्षपदासाठी बंडू तुरडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष बंडू तुरडे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याची ग्वाही दिली. पीक कर्ज, शासकीय योजना आणि सहकार क्षेत्रातील सेवा अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यां पर्यंत पोहोचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी अध्यक्ष परशुराम घारे, तसेच मधुकर घारे, यांच्यासह संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.