केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पावसाचा जून महिना सरत आला मृग नक्षत्राचे दिवसही संपत आले. तरी आभाळ कोरडे आहे. पाण्याचा एकही थेंब नाही. शेतकरी पावसाची चातक पक्षासारखी वाट पहात आहेत. जणू निसर्ग कोपला की काय? असचं वाटत आहे. निसर्गाची अवकृपा दुर होऊन पाऊस बरसण्यासाठी मुस्लिम धर्मियांकडून सामुदायिक देवाकडे प्रार्थना करत आहेत. एका सरीची तरी उधारी दे: आणी शेतक-यांच्या स्वप्नांना उभारी दे अशी आर्त विनवणी बळीराजाकडून केली जात आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळला असल्यामुळे आता निसर्गानेही धोक्याची घंटा दिली आहे. निसर्गाच्या या अवलक्षणीय बदलाचा बोध सर्वानी घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करणे वन अधिकारी तसेच प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य बनले आहे. अन्यथा भविष्यात पाणी पाणी करण्याची वेळ येण्याची शक्यता ?असल्याचे बोलले जात आहे.
चार महिन्याचा पावसाळा आणि सहा महीने उन्हाळा असे निसर्गाचे चक्र पूर्वीपासून चालत आले आहे. मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू व्हायचा. मृग नक्षत्रात भात पेरणी झाली की लावणीची कामे वेळेवर आटोपली जात असे. पावसाने मृग नक्षत्रामध्ये कधी दगा दिलेला नाही, असे शेतकरी सांगतात. मात्र अलीकडे दहा वर्षांत निसर्गामध्ये खुप बदल होताना दिसून येत आहे. अवेळी वादळी वा-यासह अवकाळी पावसाचे आगमन, त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना सतत बसत आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पावसाची वाट पाहिली जात आहे. पावसाची प्रतिक्षा वाढली असून उन्हाचे चटके बसत आहेत. मध्यप्रदेश ते मध्य महाराष्ट्र ते पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे आहेत.
अग्नेयेस अरबी समुद्रात केरळलगत समुद्रसपाटीपासून तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-याची स्थिती आहे. हाच खरा पावसाचा अडथळा असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे अल निनोचे संकट असल्याने शेतक-यानी सतर्कता बाळगावी, अशी पाऊस न पडण्याची कारणे असल्याचे बोलले जात आहे. आभाळ कोरडे आहे. पाऊस येण्याची चिन्हे दिसून येत नाही. पावसाचे आगमन होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र पावसाचा एक थेंब नाही. काही शेतक-यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी केली तेही भात वाया गेले. माणसांनी केलेल्या गंभीर चुकांचा परीणाम भोगावा लागत आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, हा नारा न देता संबधित वन अधिकारी यांनीच झाड तोडीवर निर्बंध आणून वृक्ष संवर्धनासाठी पाऊल पुढे घेतले तरच पर्यावरणाचे संवर्धन होऊन निसर्गाचा समतोल राखला जाईल!...असे बोलले जात आहे.












































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.