सावंतवाडी (प्रतिनिधी) - "योगामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. योग ही आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज संपूर्ण जगाने योगाचे महत्त्व स्वीकारले असून, प्रत्येकाने निरोगी आरोग्यासाठी दररोज योगसाधना करणे गरजेचे आहे. योगाच्या नियमित सरावामुळे अनेक रोग आणि व्याधी दूर होतात," असे आवाहन योग शिक्षिका रोहिणी बांदेकर यांनी केले. निमित्त होते पाचव्या जागतिक योग दिनाचे. या दिनाचे औचित्य साधून अगदी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीतील तीन वर्षांच्या छोट्या चिमुरड्यांपासून ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत अतिशय उत्साहात योग साधना करून हा दिवस साजरा केला.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अंगणवाडी क्र.१५ व कै.सुधाताई वामनराव कामत जि.प.शाळा व माठेवाडा सावंतवाडीचे मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी शिक्षिका भावना गावडे, पूजा ठाकूर, रणजीत सावंत, हेमांगी जाधव आणि प्राची ढवळ यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. तसेच अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि अंगणवाडी मदतनीस अमिषा सासोलकर यांनीही चिमुरड्यांना योगसाधना सुलभतेने करता यावी यासाठी विशेष सहकार्य केले.
या योग दिनाच्या कार्यक्रमात अंगणवाडीमधील छोट्या मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये राहील शेख, पूजा शिर्के, अद्विक पाटील, वेदा जाधव, प्राप्ती गवळी, श्री नेवगी, सार्थक नेवगी, स्निग्धा प्रभू, इशिता कडगावकर व चिन्मय कालेलकर या चिमुरड्यांसह पाचवीतील विद्यार्थी अद्विक पाटील याचा प्रामुख्याने समावेश होता. लहान वयातच मुलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि त्यांना योगाची सवय लागावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पालकांमधून आणि परिसरातून कौतुक होत आहे.
































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.