loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना मोठा दिलासा; रस्ते, पुलांच्या कामांसाठी ६२ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून हक्काचे पैसे न मिळाल्याने तीव्र आर्थिक अडचणीत सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांना अखेर राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील रस्ते, मोठे पूल आणि लहान पुलांच्या बांधकामांसाठी शासनाकडून तब्बल ६२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हक्काच्या पैशांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसणार्‍या ठेकेदारांमधून आता समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते आणि पुलांची कामे करणार्‍या ठेकेदारांची देयके (बिलांचे पैसे) बर्‍याच काळापासून प्रलंबित होती. हक्काचे पैसे मिळत नसल्याने अनेक ठेकेदार प्रचंड आर्थिक संकटात सापडले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या थकीत निधीसाठी जिल्ह्यामध्ये ठेकेदारांची आंदोलनेही झाली होती. अखेर शासनाने या प्रकरणी सकारात्मक पाऊल उचलत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता ’झिरो तीन (०३)’ आणि ’झिरो चार (०४)’ या हेड (लेखाशीर्ष) खाली हा निधी प्राप्त झाला आहे. या हेड अंतर्गत प्रामुख्याने रस्ते, मोठे पूल आणि लहान पुलांच्या बांधकामांचा समावेश असतो. या कामांसाठी राज्य शासनाने एकूण ६२ कोटी ८० लाख रुपये जिल्ह्याला बहाल केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त झालेल्या निधीचे वितरण तातडीने सुरू करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

चिपळूण विभाग: २१ कोटी २९ लाख रुपये, रत्नागिरी विभाग: २९ कोटी ४८ लाख रुपये.. एकूण वर्ग झालेला निधी: ५८ कोटी ६७ लाख रुपये इतका आहे. उर्वरित रक्कमही दोन दिवसांत मिळणार हा निधी प्राप्त झाल्यामुळे ठेकेदारांच्या कामांचे पैसे मोठ्या प्रमाणावर अदा करता येतील. सद्यस्थितीत ५८ कोटी ६७ लाख रुपये दोन्ही विभागांकडे वर्ग करण्यात आले आहेत. तर उर्वरित शिल्लक रक्कमही येत्या दोन दिवसांत दोन्ही विभागांना वितरीत केली जाईल. असे मिलिंद कुलकर्णी, (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी सांगितले. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रखडलेली देयके मार्गी लागणार असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांना मिळालेला हा आर्थिक दिलासा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg