loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आदर्श शाळा वायंगणी येथे शाळेच्या माजी विद्यार्थांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी - वायंगणी गावातील माजी विध्यार्थ्यानी आपल्या नवउदय प्रतिष्ठान तर्फे शाळेतील मुलांच्या गरजा ओळखून त्यांना वह्या, चित्रकलेचे साहित्य, पेन्सिल बॉक्स व शाळेसाठी कागद रिम अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य वाटप केले. यामध्ये नरेश पावसकर, प्रवीण भोवड, अमित उबारे, प्रवीण घाणेकर, निखिल शिंदे, किशोर खडसोडे, शैलेश शिंदे, अक्षय शेडगे, संतोष पावसकर व सचिन लिंगायत या माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या माजी विद्यार्थांनी केवळ शाळेतील मुलांनाच नाही तर गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील चित्रकला वही व अन्य साहित्य दिले. गावातील माजी विदयार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी माजी विद्यार्थांनी शाळेतील मुलांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा ही दिल्या. या प्रसंगी माजी विध्यार्थी, तसेच शाळेतील मुख्याध्यापिका माळी, उपशिक्षिका आदिती सावंत, अंगणवाडी ताई लिंगायत, आशा ताई प्राजक्ता लिंगायत, पोलीस पाटील खाडे व अन्य माजी विदयार्थी उपस्थित होते. विदयार्थी प्रतिनिधी अवनी शेडगे हिने माजी विद्यार्थांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg