loader
Breaking News
Breaking News
Foto

विक्रांत सावंत यांची 'एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती सदस्य म्हणून नियुक्ती

सावंतवाडी : ​भाजपचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून विशेष पत्र प्राप्त झाले आहे. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली "एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती" स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी म्हणून सावंत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक आरोग्य केंद्रातील "जन आरोग्य समिती" आणि रुग्णालयातील "रुग्ण कल्याण समिती" यांच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पोषण, पाण्याची गुणवत्ता तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. या सर्व कल्याणकारी योजनांमध्ये सावंत यांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख कराव्यात, असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg