loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरून होणारी फिनोलेक्ससहीत सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ थांबवा: मनसेची मागणी

रत्नागिरी - शहराच्या मुख्य रस्त्यावरून होणारी फिनोलेक्स सहीत सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ रोखण्यात यावी, यासाठी आज मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पावस-गोळप रोडस्थित फिनोलेक्स या कंपनीची अनेक जड आणि अवजड वाहने यांची वाहतूक रत्नागिरी शहराच्या मुख्य मार्गावरून सुरू आहे. यामुळे भूतकाळात अनेक छोटे मोठे गंभीर अपघात घडून आले आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरची गाड्यांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ बघता या अवजड वाहने ही भविष्यातील अनेक अपघाताना निमंत्रण देणारी आहे. मागील झालेल्या अपघातांचे अवलोकन करून तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि शाळा, महाविद्यालय, महत्वाची शासकीय आस्थापना याचा विचार करता अशी अवजड वाहनांची ये-जा तत्काळ रोखण्यात यावी अशी, आग्रही मागणी मनसेनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागणीची योग्य पद्धतीने दखल न घेतल्यास मनसे पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील आरटीओ प्रशासनाला देण्यात आला आहे. सदरहू विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. याप्रसंगी निवेदन देताना मनसे तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, रोहन शेलार, मार्विक नारकर, मयुरेश पड्याळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg