loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा सकपाळवाडी येथील तरुणीची आत्महत्या

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सकपाळवाडी येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहिती नुसार श्रद्धा अशोक सकपाळ वय २७ हिने दुपारी २-३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घराशेजारील वाड्यातील लाकडी वाशाला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील, साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार, साखरपा उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस कार्यवाही सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg