loader
Breaking News
Breaking News
Foto

रोहा अवचितगड रहाल परिसरात शोधमोहीम भटकंतीतून आढळून आली तोफ

रोहा [श्याम लोखंडेरायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या अवचितगड रहाल परिसरात भटकंती आणि शोधमोहीम करत असताना शुक्रवारी १२ जून रोजी तोफ गड राहाल परिसरात भटकंती करत असताना निदर्शनास आली आहे . ज्या शोध मोहिमेत शिवप्रेमी मावळे सौरभ घरट (रेवोली), मनोज थिटे (पोलिस पाटील- बाहे),संस्कार घरट(रेवोली), आर्यन काशीद(रेवोली), रोहन शेलार(रेवोली ) प्रसंगी उपस्थित होते . ]:

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही तोफ पूर्ण पणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती.जी पूर्णपणे दगड मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडली गेली होती. प्रथमतः तोफेच्या बाजूचा एक कान निदर्शनास आला. आणि आम्ही आनंदाने महाराजांचं आणि हर हर महादेव अस जयघोष करत आनंदी झालो ,शोधमोहीम यशस्वी झाली . मग प्रथमतः तेथील झाडे ,माती , पालापाचोळा दगड बाजूला करून तोफ साफ करून वर काढली तर ही तोफ ४.५ ते ५ फूट लांबीला असून ह्या तोफेवर T D अशी अक्षरे व त्या खाली तारीख किंवा तोफेच वजन कोरलेल पहायला मिळालं. ही तोफ ब्रिटिश बनावटी मधील असून ती अवचितगडावरील दक्षिणेकडील बुरुजावरून खाली पडलेली असावी जी पिंगळसई कडील दक्षिण बुरुजाच्या खालील जी नाळ आहे त्या नाळेत आढळून आली असून ही बाब पुरातत्व खात, वनविभाग रोहा, रोहा पोलिस प्रशासन व तहसीलदार यांना पंचनामा साठी कळवले आहे. लवकर ह्या तोफेला संवर्धनातून नवं संजीवन देऊ आणि गडावर पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg