loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांनी 50वा वाढदिवस कोळवली हायस्कूल येथे विद्यार्थिनींना छत्र्या वाटून केला साजरा

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी गुहागर तालुक्यातील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली हायस्कूल मधील सर्व विद्यार्थिनींना मोफत छत्र्या वाटप करून आपला 50 वा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यार्थिनींना मोबाईल आणि सोशल मीडिया यापासून दूर राहा. अभ्यास करा आणि आपली स्वप्न पूर्ण करा आई-वडिलांचे आणि आपल्या गावाचे नाव उज्वल करा असा संदेश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी दिला. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांचा आणि आरोग्य शिक्षणाचा लाभ घ्या, असे आवाहनही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांनी केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी कोळवली हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय पिसाळ, शिक्षक बाळासाहेब लवटे, शिक्षिका नीलम वाघे, लिपिक रमेश सुर्वे, शिपाई चंद्रशेखर लिंगायत, विकास कदम, कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली जाधव, आरोग्य सहाय्यक नथुराम जानवळकर आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी आणि मान्यवरांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg