loader
Breaking News
Breaking News
Foto

​दापोलीच्या 'कृषी स्नेही' गटाचा अनोखा पुढाकार; वनौशी शाळेत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

​दापोली (सागर गोवळे) -डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. 'ग्रामीण जागरूकता कार्यानुभव' (RAWE) कार्यक्रमाचा भाग म्हणून, वनौशी (तर्फे पंचनदी) येथील जिल्हा परिषद शाळेत 'कृषी स्नेही' गटातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात निसर्गाशी नाळ जोडणाऱ्या पद्धतीने झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्वागत चक्क नारळाच्या पानांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक पुष्पगुच्छाने करण्यात आले. यावेळी श्रुती बोबडे यांनी 'एक पृथ्वी, एक आरोग्य' या संकल्पनेचा आधार घेत, योगाभ्यासाचे मानवी जीवनातील महत्त्व सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सलोनी सावंत आणि अंकिता मुंज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कारांसह ताडासन, वृक्षासन आणि भुजंगासन यांसारख्या विविध योगासनांचा सराव केला. समृद्धी जाधव यांनी योगामुळे मिळणारी शारीरिक सुदृढता आणि मानसिक एकाग्रतेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. विशेष म्हणजे, व्यायामाला नृत्याची जोड देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'झुंबा' सत्राने कार्यक्रमात खरी रंगत आणली. या ऊर्जावान सत्राचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी समृद्धी जाधव, अंकिता मुंज, कोमल झिरवाल, नीलम मदने, श्रावणी मोरे, श्रुती बोबडे, सलोनी सावंत, तन्वी नांदिवडेकर, आकांक्षा गाडगे आणि साक्षी लोके या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तन्वी नांदिवडेकर यांनी केले. ​या उपक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg