loader
Breaking News
Breaking News
Foto

समुद्रकिनारी वाहून आलेल्या 'मास्कड बुबी' या दुर्मिळ पक्ष्याला जीवदान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण-दांडी श्रीकृष्णवाडी समुद्रकिनारी भूषण धुरी व त्यांचे खलाशी यांना समुद्राच्या लाटांमधून 'मास्कड बुबी' हा दुर्मिळ समुद्रीपक्षी किनाऱ्याकडे वाहत आल्याचे निदर्शनास आले. तो पक्षी उडू शकत नसल्याने गणेश तारी यांनी लगेच युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क केला. संस्थेने याची माहिती कांदळवन विभागास दिली असता त्याठिकाणी कांदळवन विभागाचे रुपेश कांदळगावकर व कर्मचारी तातडीने पोहचल्यावर स्थानिकांनी पक्षी सुखरूपपणे कांदळवन विभागाकडे सुपूर्द केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी दांडी गाव अध्यक्ष संजिव धुरी, प्रज्योत धुरी, एकनाथ केळुसकर, वसंत(जीजी) धुरी, काशिराम(नाना) तारी व इतर उपस्थित होते. तो पक्षी दमलेला असल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास सागरी वन्यजीव उपचार केंद्रात हलवले. कांदळवन विभागाच्या सागरी वन्यजीव उपचार केंद्रा मार्फत रीफ वॉच मरीन काँझर्वेशन चे पशुवैद्य मनोहर नगरे हे त्या पक्षावर उपचार करत असून पक्षी सुखरूप आहे, अशी माहिती उपचार केंद्रातून देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg