loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित 'मेडिटेशन योगा सेंटर'चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित 'मेडिटेशन योगा सेंटर'चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळकटी देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा आणि अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत - भोंसले, उप नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार मेहर पडते आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg