loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे गावातील गावातर्गंत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूकीस होतोय अडथळा

दापोली (प्रतिनिधी) : हर्णे या सर्वार्थाने सुप्रसिद्ध असलेल्या गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहेच शिवाय हर्णे वाडया, आळ्या आणि पेठा तसेच मोहल्ल्यातर्गंत रस्त्याची अवस्थाही काही चांगली नाही. त्यामुळे विकासाचा आभास निर्माण करणा-या सत्ताधा-यांचा विकास हरवलाच, असे कोणी जर म्हटलेच तर ते अजिबातच वावगे ठरणार नाही. एवढी कधी नव्हे ती हर्णे येथील गावातर्गंत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मच्छिमारी करीता जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. मासेमारीच्या काळात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या बंदरमुळे येथील लोकांच्या हाताला बऱ्यापैकी काम मिळाले आहे. त्यामुळे गावातील स्थानिक रहिवाशी तसेच बाहेरून कामासाठी आलेल्यांमुळे हर्णे गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे येथे त्याप्रमाणात व्यापार उद्दीमही वाढला आहे. वाडया, मोहल्ले, आळ्या, पेठा मिळून तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हर्णे गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे ती आहेच मात्र गावातर्गंत रस्तेही काही चांगले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हर्णे येथील छत्रपती श्री संभाजी महाराज चौक (दापोली अर्बन बॅक) ते श्री भवानी चौक मार्गे हर्णे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा महत्त्वाचा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेला रस्ता खुपच खराब झाला आहे. या मुख्य रस्त्यावर हर्णे राजवाडी, धाकटी गोडीबाव, मोठी गोडीबाव, सोनारपेठ, कासारपेठ, मोहल्ले, ब्राह्मण आळी आदी विविध वाडयावस्ती आळ्या पेठा आणि मोहल्ल्यांकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. अशा या मुख्य रस्त्यात खड्डे पडल्याने रस्त्यावरील डांबर पार उखडून गेल्याने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून राहत आहे. त्यामुळे गढुळ पाण्याने भरलेले खड्डे तुडवतच सर्वांना ये जा करावी लागत आहे. पावसाच्या सुरुवातीलाच अशी ही अवस्था असेल तर पुर्ण पावसाळ्याच्या हंगामात काय परिस्थिती होईल याचा विचारच न केलेला बरा.

टाईम्स स्पेशल

हर्णे येथे आधीच भिषण अशाप्रकारची पाणी टंचाईची समस्या होती. त्यातच रस्त्याच्या दुरवस्थेने डोके वर काढल्याने नेमके प्रशासन करते आहे तरी काय अशाप्रकारचा प्रश्न हर्णेमधील एकुणच दुरावलेला विकास पाहता कोणालाही पडल्याशिवाय रहात नाही. हे प्रशासनाच्या चांगल्या कामाचे अजिबातच लक्षण नाही कारण येथील सुप्रसिध्द असलेले मासेमारी बंदर, येथील पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ला, गोवा किल्ला, कणकदुर्ग, फत्तेगड आदी महत्वाचे ऐतिहासिक गड किल्ले पाहण्यासाठी येथे दररोजच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे रस्ते ठिक ठाक असायलाच हवेत मात्र रस्ते वाहतूक योग्य नाहीत ही खरी शोकांतिका आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यावर्षी पावसाळ्यात गटाराचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर उलटण्याची शक्यता आहे. त्यावर देखील काहीच उपाय योजना होताना दिसत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg