loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री मराठी प्राथमिक शाळा म्हसळा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी

म्हसळा - रायगड : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त रायगड जिल्हा परिषद पीएमश्री मराठी प्राथमिक शाळा म्हसळा(कन्या शाळा)येथे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी तसेच शाळेशी आपुलकीचे नाते दृढ व्हावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के यांनी म्हटले आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारास आकर्षक सजावट करण्यात आली असून विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, टाळ्यांच्या गजरात आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊ तसेच शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात येणार आहे. पीएमश्री योजनेअंतर्गत विकसित होत असलेल्या या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी व्हावी यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी विशेष तयारी केली आहे.

टाईम्स स्पेशल

प्रत्येक विद्यार्थ्याने नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाचा लाभ घ्यावा आणि उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या हास्याने आणि उत्साहाने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून जाणार असल्याने शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg