loader
Breaking News
Breaking News
Foto

निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे – जिल्हाधिकारी किशन जावळे

अलिबाग : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथे उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "योग हा केवळ व्यायाम नसून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित योगामुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि जीवनात शिस्त निर्माण होते."कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनीही उपस्थितांना योग दिनाच्या शुभेच्छा देत नियमित योग करण्याचे आवाहन केले.यावेळी स्पर्धा विश्व अकॅडमीचा विद्यार्थी सौरभ समीर वर्तक याची भारतीय सैन्य दलात आणि समीक्षा तांडेल हिची नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg