loader
Breaking News
Breaking News
Foto

मी पालकमंत्री असेपर्यंत आजगाव सह ११ गावात मायनिंग होऊ देणार नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा वेतोबा मंदिरात ग्रामस्थांना शब्द

सावंतवाडी (प्रतिनिधी):आजगाव दशक्रोशीत सध्या सुरू असलेल्या मायनिंग सर्वेक्षणावरून स्थानिक जनतेमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री देव वेतोबा मंदिरात जाऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. "मी आज देवाच्या मंदिरात बसलो आहे. त्यामुळे केवळ तुम्हालाच नाही, तर या भागातील ११ गावांतील ग्रामस्थांना शब्द देतो की, मी पालकमंत्री असेपर्यंत या गावांमध्ये कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही," असे स्पष्ट आश्वासन मंत्री राणे यांनी बैठकीत दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​गावात झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाबाबत बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, जे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले, त्याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. एखादे सर्वेक्षण करायचे असल्यास त्याला सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसते. कंपनीचे अधिकारी थेट गावात येऊन सर्वेक्षण करू शकतात आणि त्यानंतर ते आपला अहवाल सरकारला सादर करतात. जमिनीखाली मिनरल्स (खनिज) आढळल्यास ते सरकारकडे प्रकल्पासाठी विनंती करतात. त्यामुळे या सर्वेक्षणाशी आमचा किंवा प्रशासनाचा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला. "यापूर्वी मायनिंगमुळे आम्हाला भरपूर भोगावे लागले आहे, ती चूक आता पुन्हा करणार नाही. आम्ही नेहमीच लोकांसोबत राहू. तुम्ही कोणतीही चिंता करू नका आणि गावातील वातावरण खराब करू नका," असे आवाहनही त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

​या बैठकीत उपस्थित ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांना विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही मायनिंग होणार नाही असे सांगत असताना, तुमचे सहकारी कंपनीसोबत काय करत आहेत? जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी गावात का आले नाहीत? कोणत्याही यंत्रणेची परवानगी न घेता ड्रोन सर्वेक्षण झालेच कसे?" अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी केला. तसेच "तुम्ही आमच्या गावात आणि देवळात आला आहात, तर आता आम्हाला शब्द द्या," अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg