loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन

कोल्हापूर, : संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मी शक्तीपीठाला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थिती लावली. मंदिराच्या कामाच्या शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करण्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनल शहा यांच्यासोबत दर्शन घेतले. दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण देवस्थान असणाऱ्या व साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणून श्रध्देय असणाऱ्या या मंदिराप्रति केंद्रीय मंत्री अमित शहा यांची श्रद्धा सर्वश्रुत आहे. आज मंदिरात आगमन झाल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या विकास कामांकडे लक्ष देत नव्याने बसवण्यात आलेल्या सुवर्णकलशाकडे देखील लक्ष वेधले. मंदिराच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची माहिती त्यांनी घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्य मंत्री महोदय तसेच श्री. शहा यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.विजय राठोड यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg