loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे येथील मोबाईल टॉवर अखेर सुरू, मायकल लोबो यांच्या उपोषणाला यश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - भारत संचार निगम लिमिटेड यांनी मेढे तेरवण या उभा केलेला मोबाईल टॉवर गेले काही महिने बंद होता. यामुळे या भागातील शेकडो मोबाईल धारकांना नेटवर्क मिळत नसल्याने गैरसोय होत होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी तेरवण मेढे ग्रामपंचायत उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी मोबाईल टॉवरखाली उपोषण केले होते. अखेर भारत संचार निगम लिमिटेड अधिकारी यांनी दखल घेऊन मेढे येथील मोबाईल टॉवर सुरू केला. मायकल लोबो यांच्या उपोषणाला यश आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात नवीन मोबाईल टॉवर उभे केले यातून बरेच मोबाईल टॉवर बंद होते. यात मेढे येथील मोबाईल टॉवरचा देखील समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेढे येथील मोबाईल फोन सुविधा बंद झाल्याने संपर्क साधणे कठीण झाले होते. संबंधित अधिकारी यांना लेखी कळवून देखील लक्ष दिले जात नव्हते. भारत संचार निगम लिमिटेड यांच्या विरोधात मेढे मोबाईल टॉवरखाली मायकल लोबो यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. या नंतर खडबडून जागे झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड अधिकारी यांनी मेढे येथील मोबाईल टॉवर सुरू केला. यामुळे मोबाईल फोन धारकांना दिलासा मिळाला लोबो यांच्या उपोषणाला यश मिळाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg