शास्त्रीपूल (वहाब दळवी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा कळस झाला असून, गावमळा ते कुरधुंडा बंदर स्टॉप दरम्यान या महामार्गावर ’आर.एम.सी ठिकाणाहून तयार होऊन आलेले सिमेंट-खडीचे रासायनिक मिश्रण वाहून नेणार्या गाड्यांमधून हे घातक मटेरियल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच सांडले आहे. कोणतीही सुरक्षा न बाळगता आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या या वाहतुकीमुळे हा संपूर्ण रस्ता आता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून, ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे वाहनचालक व जनतेतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठेकेदार कंपनीच्या ’आर.एम.सी.’ मिक्सर गाड्यांमधून सांडलेले हे सिमेंट, खडी आणि रसायनांचे मिश्रण आता रस्त्यावरच कडक झाले असून, यामुळे रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली आहे.
रस्त्यावर सांडलेल्या खडी आणि सिमेंट मुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून भीषण अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे. जनतेने आपला जीव मुठीत ठेवला आहे का, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत. रस्त्यावर पडलेले हे घातक ’आर.एम.सी.’ मिश्रण वेळीच उचलण्याची किंवा रस्ता साफ करण्याची साधी तसदीही संबंधित ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आलेली नाही. प्रशासनाची ही कमालीची उदासिनता पाहून आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये या कंत्राटदाराने केवळ स्वतःच्या नफेखोरीसाठी जनतेला वेठीस धरण्याचा आणि रोगराईच्या कचाट्यात ओढण्याचा अधिकृत ठेका घेतला आहे की काय, असा संतप्त सवाल विचारला जात असून परिसरातील संतप्त चर्चेला उधाण आले आहे. वास्तविक पाहता, जेव्हा हे आर.एम.सी. मटेरियल रस्त्यावर ओले असताना सांडले, तेव्हाच ठेकेदाराच्या कर्मचार्यांनी त्यावर पाणी मारून ते सहज साफ करणे गरजेचे होते, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.
आता हे मटेरियल रस्त्यावर कडक सुकल्यानंतर त्याचे अतिसूक्ष्म कण भरधाव वाहनांमुळे हवेत उडत असून, या रासायनिक धुळीमुळे संपूर्ण परिसराला रोगराईच्या कचाट्यात ढकलले जात आहे. या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर उडणारी ही धूळ साधीसुधी नसून, सिमेंट लवकर सुकू नये किंवा ते अधिक कडक व्हावे यासाठी त्यात अत्यंत घातक रासायनिक मिश्रणे वापरलेली असतात. ही रासायनिक धूळ थेट दुचाकीस्वार आणि प्रवाशांच्या डोळ्यात जात असून, सिमेंटमधील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांची तीव्र जळजळ होत आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांचे डोळे निकामी होण्याचा किंवा डोळ्यांचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, प्रवाशांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ महामार्ग प्रशासन उघड्या डोळ्यांनी कसा पाहत आहे, याबद्दल तीव्र आश्चर्य व्यक्त होत आहे.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.