loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणकेरीतील माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कुणकेरी गावातील माजी विद्यार्थी संघाच्यावतीने जि. प. शाळा कुणकेरी नं. १ येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे माजी विद्यार्थी श्री. मनोज घाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुणकेरीचे उपसरपंच सुनील परब, सामाजिक कार्यकर्ते बावतीस फर्नांडिस (चराठे), मनोज घाटकर, राजन मडवळ, कैलास परब, गुरुदास कुणकेरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश परब, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम माजी विध्यार्थी- केशव सावंत, ब्रिजेश सावंत, नरेश परब - कैलास परब , महेश बाबू सावंत, सचिन मोहन सावंत , आनंद पुजारी प्रशांत सावंत (मधलीवाडी ), मनोज घाटकर यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे संपन्न झाला त्यांचे श्री. मनोज घाटकर यांनी विशेष आभार मानले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg