पनवेल - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पनवेल महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका लीना म्हात्रे, रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे आणि संतोषबुवा पाटील यांनी कोयनावेळे गावातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी गावातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी साचणे, पंप बसविण्याची आवश्यकता, ड्रेनेज लाईनची स्थिती, गटारांच्या चेंबरची दुरुस्ती तसेच सिव्हर लाईन चेंबरची तपासणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या उद्भवू नयेत आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.