केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : सरकारच्या नव्या आदेशामुळे शेतकर्यांसमोर डिझेल आणि पेट्रोल उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ११ जून रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पेट्रोल पंपांवर बॅलर, कॅन किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली असून या निर्णयाचा फटका थेट शेतकर्यांना बसत असल्याने ऐन खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आल्याची भावना लांजातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याच्या तोंडावर नांगरणी, वखरणी, पेरणीपूर्व मशागत आणि अन्य कृषी कामांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत यंत्रसामग्री बहुतांश वेळा शेतातच कार्यरत असते. अशी यंत्रे केवळ पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर नेणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी बॅलर किंवा कॅनमधून पेट्रोल व डिझेल नेऊन यंत्रांमध्ये भरत असतात.
मात्र नव्या निर्बंधांमुळे अनेक पेट्रोल पंपांनी अशा पद्धतीने पेट्रोल व डिझेल देणे बंद केल्याने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच ट्रॅक्टर, ग्रासकटर, फवारणी पंप, छोटी नांगरणी यंत्रे व रोटर पिलर आदींसह इतर कृषी यंत्रे पेट्रोल पंपावर नेण्यासाठी अतिरिक्त वेळ, इंधन आणि खर्च करावा लागत असल्याने शेतकर्यांची आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानला जातो. मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होण्याचा आणि त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने आणि निसर्गाच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच पेट्रोल व डिझेल उपलब्धतेवरील निर्बंधामुळे शेतीची कामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेतकर्यांच्या दैनंदिन कृषी कामांवर परिणाम करणार्या या निर्णयाचा पुनर्विचार करून आवश्यक सवलत द्यावी, अशी मागणी आता लांजा तालुक्यातील शेतकर्यांमधून जोर धरू लागली आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.