loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठे अधिकारी बनून सहकार्याची पोचपावती देऊ; विद्यार्थ्यांची शरद धाऊसकर यांना भावनिक ग्वाही

बांदा (प्रतिनिधी) - शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली मानत पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ पाडलोस येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी, आम्ही मोठे अधिकारी बनून तुम्ही केलेल्या सहकार्याची पोचपावती देऊ, अशी भावनिक शपथ घेतल्याने वातावरण भारावून गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, न्हावेली ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, सामाजिक कार्यकर्ते रोहन सातार्डेकर, मुख्याध्यापक विजय गावडे, शिक्षक अनिल वरक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विजय गावडे यांनी सूत्रसंचालन करत शाळेच्या डागडुजीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिक्षक अनिल वरक यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर उपसरपंच राजू शेटकर यांनी आभार मानले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य शरद धाऊसकर यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg