मालवण (प्रतिनिधी) - आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच प्रशालेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत आपली प्रगती साधली पाहिजे, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबईचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी मोफत पाठ्यपुस्तक तसेच विध्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आज शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रशालेमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत करतानाच त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच जिलेबीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, आयटीआय मालवणचे प्रिन्सिपल खेडेकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, आयटीआयचे निदेशक कोळंबकर, प्रा. पवन बांदेकर, सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. तर इस्कॉन आयोजित भगवतगीता विषयावरील स्पर्धात्मक परीक्षेत जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या तन्मय परब या विद्यार्थ्याने बेंगलोर येथील इस्रोला भेट दिल्याने त्याचा तसेच प्रशालेत नव्याने इयत्ता आठवी मध्ये दाखल झालेल्या आणि इस्रो ला भेट देणाऱ्या जुई धारगळकर या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तन्मय परब या विद्यार्थ्यांला मार्गदर्शन करणारे सहाय्यक शिक्षक अवसरे यांचा त्याचप्रमाणे मुख्याध्यापक म्हणून नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या आर. डी. बनसोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. सहाय्यक शिक्षक संदीप अवसरे यांनी आभार मानले.






































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.