loader
Breaking News
Breaking News
Foto

एक प्रेरणादायी प्रवास : नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत संगमेश्वरचा विवान भांगे ठरला ‘चॅम्पियन’

शास्त्रीपूल (वहाब दळवी) - कठोर परिश्रम, एकाग्रता आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे संगमेश्वरच्या चिमुकल्या विवान धनाजी भांगे याने सिद्ध करून दाखवले आहे. पुणे येथील बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ११ व्या नॅशनल लेव्हल अबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत विवानने शानदार कामगिरी करत ‘चॅम्पियन’ किताब पटकावला आणि राष्ट्रीय स्तरावर संगमेश्वरचे नाव उज्ज्वल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लहान वयातच विवानने अबॅकस आणि वैदिक गणितासारख्या एकाग्रता, वेगवान विचारशक्ती आणि अचूकतेची आवश्यकता असलेल्या विषयात उल्लेखनीय प्रावीण्य मिळवले आहे. त्याची जिज्ञासू वृत्ती, अभ्यासू स्वभाव आणि शिस्तबद्ध मेहनत यामुळे तो नेहमीच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शांत आणि संयमी स्वभावाचा असला तरी ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि चिकाटी त्याच्यात ठासून भरलेली आहे. स्पर्धेदरम्यान अवघ्या काही मिनिटांत अनेक गणिती उदाहरणे अचूकपणे सोडवत विवानने परीक्षकांची मने जिंकली. त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे.

टाईम्स स्पेशल

विवानच्या या यशात त्याचे वडील व प्रशिक्षक धनाजी भांगे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विवानने तार्किक विचारशक्ती, स्मरणशक्ती आणि गणितीय कौशल्यांचा प्रभावी विकास केला. तसेच कुटुंबीयांनी दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ हे त्याच्या यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहेत. विवान भांगेच्या या दैदिप्यमान यशामुळे संगमेश्वर तालुक्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावला असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही तो शैक्षणिक, बौद्धिक आणि स्पर्धात्मक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg