loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षण विभागाचे काम उत्तम तर देशाचे कामही उत्तम: मुख्यमंत्र्यांनी साधला वहाळ शाळेतील चिमुकल्यांशी संवाद

पनवेल :- जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या म्हणजे मोडकळीस आलेल्या शाळा, दर्जा नसलेल्या शाळा परंतु आता जिल्हा परिषदेच्या संपूर्ण राज्यभरातील शाळांचा हा सर्वांगीण कायापालट हा झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल युगातील डिजिटल लॅब ही स्थापन झालेले आहेत. त्यातूनच डिजिटल विद्यार्थ्यांना शिक्षण देता येणार आहे आणि ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वहाळ शाळांतील शिक्षकांचे चांगले काम असून विद्यार्थ्यांमध्ये शिस्तही जाणवली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि उत्साह हा खूप चांगला असल्याचे जाणवले. मधल्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळांची विद्यार्थी गळती ही थोडी होत होती. परंतु आता ट्रेंड बदलला असून आता खाजगी शाळेमधील विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून प्रवेश घेताना दिसत आहेत. खाजगी शाळांपेक्षा 90% उत्तम ज्ञानदानाचे काम हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून होत आहे. पालक आणि गावकरी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विशेष लक्ष दिल्यामुळेच हा बदल होत आहे. शिक्षण विभागाचे काम जर सर्वोत्तम झाले तर संपूर्ण देशाचे कामही उत्तम चालणार असे गौरव उद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पनवेल तालुक्यातील वहाळ शाळेच्या पहिल्या दिवसाच्या प्रवेश उत्सवानिमित्त संवाद साधताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील 15 जून रोजी विदर्भ वगळता सर्वच शाळा या सुरू झाल्या. शाळांमधून पुन्हा गजबजाट आणि किलबिलाट पाहायला मिळाला. या पहिल्या दिवसाच्या वेळी येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे अबूतपूर्व अन आगळ्यावेगळ्या पद्धतीने जल्लोषात स्वागत करून त्यांना शिक्षणाविषयी गोडी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव हा राज्यभर राबविला गेला. यासाठी दस्तुरखुद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वहाळ शाळेत येऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके देऊन त्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. हा स्वागत सोहळा प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चिरकाल स्मरणात राहणार आहे. या स्वागत उत्सवाच्या निमित्ताने विद्यालयांमध्ये लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, राज्याचे शिक्षण विभागाचे सचिव उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषदेतील आमदार विक्रांत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त कोकणचे श्रीमती रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, पनवेल पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारी शाहू सतपाल तसेच विविध राजकीय पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विद्यार्थी पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी विद्यार्थी पालक यांचे ढोल लेझीम ताशाच्या ठसक्यात अन गुलाब पुष्पांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. वहाळ शाळेमध्ये प्रथमच नव्याने प्रवेश घेतलेल्या 24 विद्यार्थ्यांचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवादही साधला त्यामुळे चिमुकले ही यावेळी आनंदित झालेले दिसले. या चिमुकल्यांनाही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवण्यात आले होते. सर्वच विद्यार्थी पहिल्याच दिवशी संपूर्ण गणवेशात असलेले दिसले. प्रवेशाच्या उत्सवानिमित्त शाळेची रंगरंगोटी शाळेचा परिसर हा विविध फुग्यांनी, विविध रंगाच्या ढंगाच्या रांगोळीच्या सड्यांनी सजवण्यात आला होता. या प्रवेशोत्सवासाठी वहाळ परिसरातील पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg