रत्नागिरी : इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रत्नागिरीचा सुपुत्र अविराज अनिल गावडे याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब या संघाविरुद्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीरचा बहुमान पटकावला आहे. या हंगामातील अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब या संघाविरुद्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला आहे. या सामन्यात अविराजने ६० रन्स ची नाबाद खेळी करत आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.
हा सामना अटीतटीच्या झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अविराजने कमाल केली. आपल्या गुगलीची कमाल दाखवत अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब संघातील खेळाडूंवर शेवटपर्यंत दडपण ठेवले. या सामन्यात अविराजने गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने २.६१ च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मैदानात फिल्डिंग करताना दोघांना झेलबाद केले. त्यामुळे अलेक्झांडर पार्क क्रिकेट क्लब संघ १५५ मध्ये ऑलआऊट झाला. पेशवा क्रिकेट क्लब संघाने हा सामना 5 विकेट राखून जिंकला.
यापूर्वीच्या 'लंडन टायगर्स' संघाविरुद्ध खेळताना अविराजने अष्टपैलू कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत अविराजने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.