loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे गुहागर तालुका तर्फे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

वरवेली गणेश किर्वे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे गुहागर तालुका तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा शृंगार तळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली. स्पर्धेला तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे सर यांनी काम पाहिले. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये छोट्या गटामध्ये (विषय_ माझा महाराष्ट्र) प्रथम क्रमांक – ध्रुवी वेल्हाळ,द्वितीय क्रमांक – राज्ञा राहुल जाधव,तृतीय क्रमांक – रुद्राक्ष रहाटे तर सहभाग म्हणून मानसी मूकनाक तसेच गट क्रमांक २ मध्ये (विषय_ मला माहित असणारे राज साहेब ठाकरे )प्रथम क्रमांक – वनश्री परशुराम मूकनाक, द्वितीय क्रमांक – पंकजा सचिन होळंबे,तृतीय क्रमांक – गोजिरी अप्पाराव मुळे,सहभाग – पूर्वा सचिन जाधव, मनाली महेंद्र मूकनाक,खुला गटामध्ये (विषय - मराठी अस्मिता व माझे कर्तव्य) प्रथम क्रमांक – डॉ. उत्कर्षा प्रमोद लाड,द्वितीय क्रमांक – प्रगती पद्मनाभ जोशी,तृतीय क्रमांक – महेंद्र दिलीप दणदणे तर सहभाग – समर्थ कळंबाटे यांना सन्मानपत्र देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, तालुका सचिव प्रशांत साटले, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, मळण गाव शाखाध्यक्ष मंगेश धामणस्कर, कौंढर-काळसूर गाव शाखाध्यक्ष सुनील मूकनाक, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, गुहागर शहर संघटक दर्शन जांगळी, गुहागर उपशहराध्यक्ष विक्रांत सांगळे, उपतालुकाध्यक्ष अमित खांडेकर, विभाग प्रमुख राहुल जाधव, महाराष्ट्र सैनिक स्वप्निल जाधव, गुहागर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रथमेश रायकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला विकसित करण्याची संधी मिळाली. उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg