loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली-रत्नागिरी शेवटची गाडी संगमेश्वर स्थानकात न आल्याने प्रवाशांचे हाल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - चिपळूणहून संध्याकाळी पावणे सात वाजता सुटणारी दापोली-रत्नागिरी ही एसटी बस संगमेश्वर स्थानकात न येता थेट उड्डाणपुलावरून पुढे गेल्याने अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर बस नेहमीप्रमाणे रात्री पावणे आठ ते आठ वाजण्याच्या दरम्यान संगमेश्वर स्थानकात येते. रत्नागिरीकडे जाणारी ही दिवसातील शेवटची लोकल बस असल्याने अनेक प्रवासी स्थानकात बसची प्रतीक्षा करत उभे होते. मात्र चालकाने बस स्थानकात न आणता थेट पुढे नेल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही बाब काही पत्रकारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर जिल्हा नियंत्रक (डीसी) यांनी संगमेश्वर स्थानकप्रमुखांशी संपर्क साधून विशेष बस सोडण्याच्या सूचना दिल्या. डीसी यांच्या आदेशानुसार संगमेश्वर स्थानकातून विशेष बस सोडण्यात आली. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची सोय झाली. दरम्यान, दापोली, खेड आदी मार्गावरील काही बस चालकांकडून मनमानी कारभार होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, संबंधित चालकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg