loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत पाऊस पडण्यासाठी मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना

रत्नागिरी (जमीर खलफे): रत्नागिरी आणि परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेले संकट दूर व्हावे आणि तात्काळ पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी शुक्रवार, १९ जून रोजी असरच्या नमाझनंतर जमियत उलेमा रत्नागिरीच्या वतीने विशेष ‘नमाझ-ए-इस्तिस्का’ (पावसासाठीची विशेष सामूहिक प्रार्थना) अदा करण्यात आली. राज नगर येथील मरकझ मैदानावर झालेल्या या प्रार्थनेसाठी रत्नागिरी शहर आणि परिसरातील अनेक सन्माननीय मुफ्ती, उलेमा आणि शेकडो मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नमाझच्या सुरुवातीला मुफ्ती खल्फान कासमी यांनी उपस्थितांना नमाझ पठणाची पद्धत समजावून सांगितली. तसेच सर्वांनी आपल्या चुकांची माफी मागत अधिकाधिक ‘इस्तिगफार’ (क्षमायाचना) करावी आणि गरिबांना दानधर्म (सदका) करावा, असे आवाहन केले. या विशेष नमाझचे नेतृत्व (इमामत) हाफिज नूरुल्लाह यांनी केले. नमाझ संपन्न झाल्यानंतर मुफ्ती खल्फान यांनी ‘खुत्बा’ (धार्मिक प्रवचन) पठण केले. त्यानंतर मौलाना इलियास बगदादी यांनी अत्यंत भावूक आणि रडवून सोडणारी विशेष प्रार्थना (दुआ) केली, ज्यामध्ये अल्लाहकडे लवकरात लवकर आणि फायदेशीर पाऊस पाडण्याची आळवणी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमाच्या शेवटी मौलाना फहीम यांनी प्रार्थनेसाठी आलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

जमियत उलेमा रत्नागिरीचे अध्यक्ष मौलाना जुबेर नाकाडे यांच्या एका छोट्याशा आवाहनावर एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले, याबद्दल त्यांनी अल्लाहचे आभार मानले. “अल्लाह आपल्या सर्वांच्या चुका माफ करेल आणि आपल्यावर नक्कीच रहमतचा (कृपेचा) पाऊस पाडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या धार्मिक कार्यात सहकार्य केल्याबद्दल राज नगर मरकझचे प्रमुख अशरफ नाईक, व्यवस्थापन समिती आणि सेवेची जबाबदारी सांभाळणाऱ्या मस्जिदवार जमातीचे स्वयंसेवक तसेच सर्व सहभागी नागरिकांचे जमियतच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg