loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरीच्या एका NEET बॅचमधील 15 विद्यार्थी झाले डॉक्टर

खेड (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात एखादा विद्यार्थी डॉक्टर होणे ही अभिमानाची बाब असते; मात्र एका शाळेच्या एका NEET बॅचमधील तब्बल 15 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होणे ही अत्यंत दुर्मीळ आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या 2020-21 च्या बॅचने हा मानाचा टप्पा 2026 मध्ये गाठून कोकणातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने गेल्या अनेक वर्षांत NEET आणि JEE परीक्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. मात्र एका बॅचमधील 15 विद्यार्थ्यांनी डॉक्टर म्हणून यशस्वीपणे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणे, ही कामगिरी संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि दूरदृष्टीची प्रचीती देणारी ठरली आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये डॉ. अद्वैत भोसले, डॉ. श्रावणी पार्थे, डॉ. पूजा राजपूत, डॉ. श्रद्धा खेडेकर, डॉ. यश गांगल, डॉ. अय्युब चौगुले, डॉ. मुक्ताई धामणसकर , डॉ. प्रेरणा गुजर, डॉ. सानिया मेमन, डॉ. धनश्री गावणकर, डॉ. अमेय मोरे, डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. श्रुती यादव, डॉ. मधुरा बोंडले आणि डॉ. अन्वी तलाठी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, रोटरीची यशोगाथा केवळ बोर्ड परीक्षांच्या निकालांपुरती मर्यादित नाही. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून NEET-JEE सारख्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांपर्यंत, तसेच देशातील नामांकित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यापर्यंतचा सर्वांगीण प्रवास घडविण्याची क्षमता संस्थेने सिद्ध केली आहे.

टाईम्स स्पेशल

कोकणात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल आज केवळ एक शाळा नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ बनली आहे. एका बॅचमधील १५ विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याची ही घटना केवळ संस्थेचा गौरव नसून संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. "विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा उत्तीर्ण करणे नव्हे, तर जीवनात मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते साकार करण्याची क्षमता देणे" या तत्त्वज्ञानावर उभी असलेली रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल आजही कोकणातील शिक्षणाच्या नव्या शक्यता निर्माण करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET रिपीटर बॅच दि. 25 जून 2026 पासून सुरू होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg